|| जय गोपाला || || जय श्रीराम ||73877 77383nisargashrushtigopalansanstha@gmail.com
निसर्गसृष्टी गोपालन संस्था

आमचे कार्य

गोसेवेपासून गोसंवर्धनापर्यंत

गोवंशाचे संरक्षण व संगोपन

कत्तलखान्यातून सोडविण्यात आलेला, निराधार, भटक्या, अपघातग्रस्त, अपंग किंवा सेवेसाठी आलेल्या गोवंशाला सुरक्षित निवारा आणि आवश्यक देखभाल उपलब्ध करून देणे.

चारा व्यवस्था

गोवंशाच्या आरोग्याचा विचार करून हिरवा व कोरडा चारा नियमितपणे उपलब्ध करून देणे.

पाणी व्यवस्था

गोवंशासाठी स्वच्छ आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था करणे.

आरोग्य व उपचार

आजारी, जखमी आणि गरजू गोवंशासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा, औषधोपचार आणि निगा राखणे.

निवारा व शेड

गोवंशासाठी सुरक्षित, प्रशस्त आणि हवेशीर निवाऱ्याची व्यवस्था निर्माण करणे.

वृक्षसंवर्धन

गोशाळेच्या परिसरात वृक्षारोपण, वृक्षसंगोपन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे.

चारा निर्मिती

गोशाळेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी चारा शेती आणि संबंधित उपक्रम विकसित करणे.